By  
on  

International Dogs Day च्या निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने पोस्ट केला हा व्हिडीओ

आज आंतरराष्ट्रीय डॉग्ज डेच्या निमित्ताने मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. बहुतांश कलाकार हे प्राणीप्रेमी, विशेषकरून ज्यांना श्वान पाळण्याची आवड आहे त्यांनी सोशल  मिडीयावर आज पोस्ट केल्या आहेत.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरकडे देखील गोंडस पेट डॉग आहे. डोरा असं या डॉगचं नाव आहे. सिद्धार्थने नुकतच त्याचा डोरासोबतचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. सिद्धार्थ डोराला रडकी पोरगी असं म्हणतो. तो असं का म्हणतो हे व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईलच. 

 

या व्हिडीओत सिद्धार्थ डोरासोबत कशी मस्ती करतो ते पाहायला मिळतय. या पोस्टमध्ये तो लिहीतो की, "इंटरनॅशनल रडक्या पोरीला हॅपी इंटरनॅशनल डॉग्ज डे."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive