By  
on  

'जय देवा श्री गणेशा' मालिकेतील कलाकारांची फन टाईम मस्ती

गणेश चतुर्थी पासून टेलिव्हिजनवर गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. विविध मालिकांमध्येही गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्पेशल भाग पाहायला मिळत आहेत. यातच गणरायाची कथा सांगणारी एक नवी मालिका नुकतीच सुरु झाली आहे. 'जय देवा श्री गणेशा' असं या मालिकेचं नाव असून या मालिकेत गणपती बाप्पाची कथा दाखवली जात आहे.

अभिनेता पंकज विष्णू या मालिकेत शंकर देवाच्या भूमिकेत आहेत तर अभिनेत्री भाग्यश्री मोटे या मालिकेत देवी पार्वतीची भूमिका साकारतेय. याशिवाय एकापेक्षा एक कलाकारांची फळी या मालिकेत पाहायला मिळतये. मात्र या सगळ्या देवांच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा एकत्र सेल्फि नुकताच समोर आलाय. चित्रीकरन नंतरचा यांचा फन टाईम सेल्फि अभिनेता पंकज विष्णूने सोशल मिडीयावर शेयर केलाय.

या सेल्फिमध्ये पार्वती, शंकर, नंदी अशा विविध भूमिका साकारणारे कलाकार एकत्र दिसत आहेत. 11 भागांची ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने  गणेशभक्तांसह सगळे या मालिकेचा आस्वाद घेत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive