अभिनेत्री सुखदाही अभिनेत्रीसह उत्तम नृत्यांगनादेखील आहे. सुखदा ही सोशल मिडीयावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिने नुकतेच पोस्ट केलेले तिचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच चर्चेत आले आहेत. या फोटोंमध्ये निळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे. निसर्गरम्य वातावरणात क्लिक केलेले सुखदाचे हे सुंदर फोटो तिच्या फॉलोवर्सनाही प्रचंड आवडले आहेत.
सुखदाही अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नि आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अभिजीतच गुरुनाथची लोकप्रिय भूमिका साकारतो. तर सुखदाही तिच्या विविध नाटकांमधून पाहायला मिळते. सुखदा तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे.