By  
on  

पाहा Video : आदिनाथ कोठारे म्हणतोय 'फिर से उड चला..'

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार घरात निवांत वेळ घालवताना दिसले. एवढच नाही तर घरात ते काय काय करत आहेत याविषयीच्या अपडेट्स कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून देत राहीले. या काळात मनोरंजन क्षेत्राीतल कलाकार सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसले.

अभिनेता आदिनाथ कोठारे देखील सोशल मिडीयावर विविध पोस्ट टाकू लागला. याआधीही तो पोस्ट करायचा पण लॉकडाउनच्या काळात तो मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर अपडेट राहिल्याचं चित्र दिसलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Phir se ud chala..

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

 

नुकतच आदिनाथने त्याच्या घरातील टॅरेसवरील त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत आदिनाथ आनंदाने उंच झेप घेताना दिसतोय. फिर से उड चला या गाण्यावर त्याने हा व्हिडीओ केलाय. आदिनाथच्या या आनंदाचं कारण काही त्याने पोस्ट केलेला नाही. मात्र त्याचा हा सकारात्मक व्हिडीओ त्याच्या इतर फॉलोवर्सना प्रेरणा देईल एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive