By  
on  

अनुजा साठेच्या या वेब सिरीजचा येणार दुसरा सिझन, दिग्दर्शकाने पोस्ट करून केली घोषणा

'एक थी बेगम' या वेब सिरीजला लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात चांगला प्रतिसाद मिळाला. अश्रफ उर्फ सपना दीदी जिने तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी स्वत:ला बदललं होतं. त्याच सपना दीदीची खरी कहाणी या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळाली. अभिनेत्री अनुजा साठेने ही मुख्य भूमिका साकारली आहे. या वेब सिरीजचा अपूर्ण शेवट अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे. आणि म्हणूनच या प्रश्नांची उत्तर कादचित या वेब सिरीजच्या आगामी भागात मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

नुकतच या वेब सिरीजचे लेखक दिग्दर्शक सचिन दरेकर यांनी या वेब सिरीजचा दुसरा सिझन येणार असल्याचं सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगीतलं आहे. त्यांनी सिझन 2 असा लिहीलेला फोटो पोस्ट करून 'लवकरच' असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Coming soon...

A post shared by Sachin Darekar (@darekarsachin) on

 

तेव्हा लवकरच या वेब सिरीजचा दुसरा सिझन पाहायला मिळेल. त्यात अपूर्ण राहिलेली कथा पुढे पाहायला मिळेल का पाहणं रंजक असेल.

या वेब सिरीजमध्ये अनुजा साठेसह अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिरसाटकर, रेशम, अभिजीत चव्हाण, प्रदिप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम,संतोष जुवेकर, अनिल नगरकर, सुचित जाधव, अद्वैत दादरकर हे कलाकार झळकले होते. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive