पुन्हा एकदा बिग बॉस मराठी, होणार सिझन एक नंबरचा ग्रँड प्रिमियर

By  
on  

हिंदी टेलिव्हिजनवर सगळ्यात चर्चेत असणारा आणि वादात असणारा रिएलिटी शो म्हणजे बिग बॉस. 2018 मध्ये हा शो मराठीतही आला. पहिल्यांदाच बिग बॉस हा कार्यक्रम मराठी भाषेत असल्याने सगळ्यांनाच उत्सुकता होती. पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा सिझन प्रचंड लोकप्रिय झाला.

त्यातच तिसऱ्या सिझनची उत्सुकता असताना कलर्स मराठी वाहिनी तिसऱ्या पर्वाची घोषणा कधी करेल याचीच उत्सुकता असताना प्रेक्षकांना आता वेगळं सरप्राईज मिळतय. कारण बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनचं पुन्ह:प्रसारण करण्यात येणार आहे. मेघा धाडे ही पहिल्या सिझनची विजेती ठरली होती. आणि आता पुन्हा एकदा पहिलं सिझन प्रेक्षकांना पाहता येणार आहे. येत्या 6 सप्टेंबरला या पहिल्या सिझनचा ग्रँड प्रिमियर पार पडेल. 

 

मागील वर्षी मराठी बिग बॉसचा दुसरा सिझन आला आणि तोही रंजक ठरला. लॉकडाउनच्या काळात दुसऱ्या सिझनचे भाग पुन्हा प्रसारित करण्यात आले होते. आणि घरबसल्या पुन्हा टास्क, कन्फेशन रुम, स्पर्धकांची भांडणं, बिग बॉसचा आवाज या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. 

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत तिसरं सिझन पुढे ढकलल्याचं पाहायला मिळतय.

Recommended

Loading...
Share