By  
on  

सिंगल स्क्रीन थिएटर सुरु करण्यासाठी दिग्दर्शक विजू माने यांचे आंदोलन

कोरोनाग्रस्त परिस्थितीत सध्या हळूहळू विविध गोष्टी पुर्ववत होताना दिसत आहेत. मात्र अनलॉकच्या यादीतून थिएटर्स वगळल्याचं चित्र पाहायला मिळतय. विशेष म्हणजे यात सिंगल स्क्रिन थिएटर्सचं नुकसान होत आहे. म्हणूनच सिंगल स्क्रीन थिएटर सुरु करावी या मागणीसाठी ठाण्यातील वंदना थिएटरचे चालक आणि दिग्दर्शक विजू माने यांनी ठाण्यात थिएटर बाहेर आंदोलन केले आहे. एकीकडे लॉकडाउनमध्ये थिएटर बंद करण्यात आली. मात्र पाच महिन उलटूनही थिएटर्स उघडण्यावर कोणताच निर्णय समोर आलेला नाही. यामुळे थिएटर व्यवसायावर संकट आलं आहे. अनलॉकच्या यादीतून थिएटर्सना वगळण्यात आल्याने अनेक थिएटरचे चालक-मालक हे देशोधडीला लागले आहेत. 

आणि म्हणूनच शांततेत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनात ठाण्यातील वंदना, मल्हार, गणेश, प्रभात, अशोक, आनंद या सगळ्या सिंगल स्क्रीन थिएटरचे चालक मालक यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. यावेळी विविध सिनेमांच्या पोस्टर्सवर थिएटर उघडण्यासंदर्भातील मेसेज लिहीलेले पोस्टर्स हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

 

गेल्या पाच महिन्यांपासून सिंगल स्क्रीन थिएटर बंद असल्यानं थिएटर चालकांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय यासंदर्भात थिएटर मालक संघटनेचे नितीन दातार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना एक निवेदनही काही दिवसांपूर्वी दिलं असल्याचं कळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive