By  
on  

ही अभिनेत्री आहे तेजश्री प्रधानची खास मैत्रीण, पोस्ट केला थ्रोबॅक फोटो

अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मिडीयावर तिच्या आयुष्यातील विविध गोष्टी पोस्ट करताना दिसते. नुकताच तेजश्रीने एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो आहे तिच्या खास मैत्रिणीसोबतचा. ही खास मैत्रीण आहे अभिनेत्री सुरुची अडारकर. 

सुरुची आणि तेजश्री या बेस्ट फ्रेंड्स आहेत. सोशल मिडीयावर दोघीही त्यांचे फोटो पोस्ट करत असतात. तेजश्रीने नुकताच पोस्ट केलेला फोटो हा थ्रोबॅक म्हणजेच जुना फोटो आहे. दोघींनी याआधीही त्यांच्या ट्रेकिंगचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत तेजश्रीला पुन्हा ट्रेकिंग करायची इच्छा होत असल्याचं ती म्हणतेय. 

तेजश्री या पोस्टमध्ये लिहीते की, "चल पुन्हा बॅग पॅक कर, माउंटन्स बोलवत आहेत."

या फोटोत या दोघी मैत्रीण तंबूत दिसत आहेत. शिवाय त्यांच्या ट्रेकिंगची खास आठवण या फोटोत पाहायला मिळतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive