By  
on  

पाहा Video : स्वप्निल जोशी बनला आयरन मॅन, म्हणतो "रॉबर्ड डाउनी जूनियर अगदी माझ्यासारखा दिसतो"

सोशल मिडीयावर सध्या फेस ऐपचा ट्रेंड सुरु आहे. ज्यात विविध सिनेमातील स्टार्सच्या चेहऱ्याला आपला चेहरा लावून तो व्हिडीओ करता येतो. विशेषकरून यात बॉलिवुडसह हॉलिवुड चेहऱ्यांनाही एडिट करता येते. सध्या सोशल मिडीयावर अनेक जण अशापद्धतिचे व्हिडीओ पोस्ट करत आहेत. 

अभिनेता स्वप्निल जोशीचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. त्या चाहत्यांनी स्वप्निल जोशीचाही असाच एक व्हिडीओ बनवला आहे. 'आयरन मॅन' सुपरहीरो साकारलेल्या रॉबर्ट डाउनी जूनियर या हॉलिवुड स्टारच्या चेहऱ्याला स्वप्निलचा चेहरा यात लावण्यात आला आहे.

 

स्वप्निलला हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेयर केला आहे. स्वप्निल या व्हिडीओच्या पोस्टमध्ये लिहीतो की, "हायला, रॉबर्ड डाउनी जूनियर अगदी माझ्यासारखा दिसतो. छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला आनंद देतात."

हा व्हिडीओ पाहून स्वप्निलला प्रचंड आनंद झाल्याचं या पोस्टमध्ये पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive