अभिनेत्री अमृता खनविलकरचा पति हिमांशु मल्होत्राने नुकताच एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे या फोटोत अभिनेत्री अमृता आणि हिमांशु दोघे दिसत आहेत.
या पस्टमध्ये हिमांशु लिहीतो की, "सुख आणि आनंद". अमृता आणि हिमांशु या सुंदर जोडीचा हा हसरा फोटो सगळ्यांनाच आवडतोय.
सोशल मिडीयावर जेव्हा हे कपल फोटो पोस्ट करतो तेव्हा फॉलोवर्स त्यावर लाईक्सचा वर्षाव करतात. ही ऑफस्क्रिन रियल लाईफ जोडी अनेकांना आवडते. सोशल मिडीयावरही दोघांची अपडेट्स आणि एकत्र फोटो दोघांच्या चाहत्यांना आवडतात. 'नच बलिये' या प्रसिद्ध डान्स रिएलिटी शोच्या सातव्या पर्वाचे दोघं विजेते ठरले होते. या जोडीला त्या कार्यक्रमातही पसंत केलं होतं. 2015 मध्ये अमृता आणि हिमांशुने लगीनगाठ बांधली होती.