भारतीय शास्त्रीय संगीतातील गायकांपैकी मानाचं नाव म्हणजे गानसरस्वती किशोरी आमोणकर. त्यांच्या शास्त्रीय गायकीने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अभिनेता वैभव मांगले हे किशोर आमोणकर यांचे मोठे चाहते आहेत. ते दररोज किशोरी ताईंची गाणी ऐकतात. नुकतच सोशल मिडीयावर वैभव यांनी एक पोस्ट केली आहे.
किशोर ताईंप्रतीचा आदर, त्यांची अलौकिक गायनशैली याविषयी वैभव मांगले त्यांच्या या पोस्टमध्ये लिहीतात. ते लिहीतात की, "किशोरी ताई तुम्हाला जाऊन 3 वर्ष झाली. पण तुम्ही गेलात हे काही सत्य नाही. कारण तुमचं गाणं अजरामर झालं आहे. माझा एक हि दिवस असा जात नाही कि मी तुमचं गाणं ऐकलं नाही . माझं सांगीतिक विश्व तुम्ही पूर्णपणे व्यापून टाकल आहे.आताशा तर दुसऱ्या कुणाच गाणं ऐकताना मागे तुमच गाणं चालू होत आणि सगळंच बिघडतं. तुमचं गाणं गारुड आहे , चेटूक आहे. ज्याला याने झपाटलं तो रसिक वेडा झाला . त्याला बाकीचं काही ही रुचणार नाही."
याशिवाय या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या गायकीविषयी बऱ्याच गोष्टी लिहील्या आहेत.या पोस्टमध्ये ते शेवटी लिहीतात की, "ताई तुम्ही थोर आहात. आतातर ज्याच्या कले पुढे मान खाली झुकावी अशी माणसं एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकीही शिल्लक नाहियेयत. तुम्ही एकमेवातद्वीतीय आहात. तुमच्या मनात ,विचारात सौंदर्य होतं म्हणून तुमचा सूर सुंदर झाला.. गाणं वॅन गॉग च्या रंगानं सारखं रंगीत ,सजीव झालं, आणि मी हि सुंदर झालो. तुमचं गाणं आत रुतायला आत्मा सुंदरच असावा लागतो."
वैभव मांगले हे एक संगीतप्रेमी असून त्यांना स्वत:ला गायनाची प्रचंड आवड आहे.