अभिनता चिराग पाटीलने आज शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. हे सांगताना त्याने त्याच्या आयुष्यातील शिक्षकांविषयी सांगीतलं आहे. चिरागचे आई-वडिल हे त्याच्यासाठी मोठे शिक्षक असल्याचं तो सांगतो.
चिराग हा प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा आहे. तेव्हा वडिल संदीप पाटील आणि आईसोबतचे फोटो चिरागने पोस्ट केले आहेत. वडिलांविषयी तो लिहीतो की, "बाबा मला नेहमी सांगतात की आयुष्य हे लहान आणि अप्रत्याशित आहे. तेव्हा प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. आयुष्य किंग साईज जगा. इतरांविषयी विचार करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही जे करताय आणि तुम्हाला जिथे जायचय त्यावर लक्ष केंद्रित करा. नेहमी तुमची स्वत:ची शर्यत चालवा दुसऱ्यांची नाही. तुमच्या ह्रदयाचं ऐका. कुटुंब हे सगळं काही असतं त्याला नेहमी त्याला प्राधान्य द्या."
चिरागने त्याच्या वडिलांचा हा कानमंत्र शेयर केलाय. याशिवाय त्याने त्याच्या आईविषयीही खास पोस्ट लिहीली आहे.