गायत्री दातारचा हा क्युट व्हिडीओ वेधतोय चाहत्यांचं लक्ष

By  
on  

अभिनेत्री गायत्री दातार 'तुला पाहते रे' या मालिकेतून प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतून ईशाच्या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर रिएलिटी शो, नाटक या विविध प्लॅटफॉर्मवरही गायत्री दिसली. त्यामुळे गायत्रीचा एक मोठा चाहतावर्ग आहे. याच चाहत्यांसाठी गायत्री नुकताच सोशल मिडीयावर एक क्टुट व्हिडीओ पोस्ट केला आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर सध्या रिल फिचर चांगलचं गाजतय. यात विविध गाण्यांवर व्हिडीओ करता येतो. गायत्रीने देखील असाच एक व्हिडीओ केला आहे. गायत्रीचा हा क्युट व्हिडीओ चाहत्यांना आवडला आहे. गायत्रीने मध्यरात्री हा व्हिडीओ शुट केला आहे. या पोस्टमध्ये तिने "मिडनाईट मॅडनेस" असं कॅप्शन दिलय.

 

'युवा डान्सिंग क्विन' या डान्स रिएलिटी शोमध्ये देखील गायत्री स्पर्धक म्हणून दिसली होती. मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर गायत्रीने याच शोमध्ये सुत्रसंचालक म्हणून काम केलं.

Recommended

Loading...
Share