By  
on  

जुई गडकरीला व्हायचयं या अभिनेत्रीची सून, वाढदिवसाला चक्क केली अशी पोस्ट

अभिनेत्री उमा गोखले यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  'वर्तुळ' या मालिकेत उमा यांनी अभिनेत्री जुई गडकरीच्या सासूची भूमिका साकारसी होती. याच निमित्ताने जुईची उमा यांच्यासोबत मैत्री झाली.

जुईने उमा यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या आहेत. जुईने सेटवरील काही ऑफस्क्रिन फोटो यानिमित्ताने पोस्ट केले आहेत. 

जुई या पोस्टमध्ये लिहीते की, "माझ्या लाडक्या ऑनस्क्रिन सासुबाईंचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या शुभेच्छा उमे. मी तुझ्यावर प्रेम करते. ऑफस्क्रिन पण आवडलं असतं  तुमची सुन व्हायला. वर्तुळने दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट."

 

या पोस्टमध्ये जुई चक्क त्यांची ऑफस्क्रिन सुन होण्याची गोष्ट करताना दिसतेय. या मजेशीर पोस्टमध्ये जुईने उमा यांच्यासोबतच्या खास आठवणी शेयर केल्या आहेत. वर्तुळ ही एक थ्रिलर मालिका होती. ज्यात जुई गडकरीची हटके भूमिका पाहायला मिळाली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive