By  
on  

अशी होते अमेय वाघच्या दिवसाची सुरुवात, पोस्ट केला हा व्हिडीओ

सध्या लॉकडाउनच्या काळात अनेक संगीत प्रेमी घरात बसून विवि गाण्यांचा आस्वाद घेत आहेत. यातच अनेकांना नाट्यसंगीताचीही आवड आहे. अशापैकीच एक आहे अभिनेता अमेय वाघ. अमेय वाघने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत हिंदुस्तानी शास्त्रीय गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच नाट्यसंगीत ऐकायला मिळतय.

अमेयने या व्हिडीओत या नाट्यसंगीतावर लिप सिंक केलेलं पाहायला मिळतय. अमेय हा त्याच्या दिवसाची सुरुवात पंडित अभिषेकी बुवांच्या नाटयसंगीताने करतो तर सांगता पंडित वसंतराव देशापांडेंच्या नाट्यसंगीताने करत असल्याचं या पोस्टमध्ये म्हणतोय.

अमेय या पोस्टमध्ये लिहीतो की, "दिवसाची सुरूवात पं.अभिषेकी बुवांनी आणि सांगता पंडित वसंतरावांनी ! तुम्ही नाट्यसंगीत प्रेमी आहात का? काय ऐकायला आवडतं?"

दिवसाची सुरूवात पं.अभिषेकी बुवांनी आणि सांगता पंडित वसंतरावांनी ! तुम्ही नाट्यसंगीत प्रेमी आहात का? काय ऐकायला आवडतं?

 

ही पोस्ट करत अमेयने त्याच्या चाहत्यांनाही त्यांच्या नाट्यसंगीत प्रेमाविषयी विचारलं आहे. चाहत्यांना अमेयचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. विशेष म्हणजे या नाट्यसंगीतावर अमेयचे हावभावही त्यांना आवडले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive