पाहा Photos : रितेश देशमुखकडून खिलाडी अक्षय कुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

अभिनेता रितेश देशमुख आणि खिलाडी अक्षय कुमार यांची ऑनस्क्रिन जोडी पसंत केली जाते. बऱ्याच विनोदी सिनेमांमधून या दोघांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. मात्र ही जोडी फक्त ऑनस्क्रिन मर्यादीद नसून ऑफस्क्रिन या दोघांची घट्ट मैत्री आहे.

आज खिलाडी अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन क्षेत्रातील मंडळीही अक्षयला सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. त्यातच त्याचा मित्र रितेश देशमुखनेही अक्षयला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेशने अक्षयसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. रितेश या पोस्टमध्ये लिहीतो की, "माझा भाऊ, माझा मित्र, माझा सहकलाकार - मी तुझ्यावर प्रेम करतो सुंडी - तुला माझ्याकडून शुभेच्छा." असं लिहून रितेशने अक्षयसोबतचे काही खास क्षण पोस्ट केले आहेत.

 

रितेशसह अनेक कलाकारांनी आज सोशल मिडीयावर अक्षयसोबतचे फोटो पोस्ट करून त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात. 

रितेश देशमुखने आत्तापर्यंत 'हे बेबी', 'हाउसफुल', 'हाउसफुल 2', 'हाउसफुल 3', 'हाउसफुल 4' या सिनेमांमध्ये अक्षय कुमारसोबत काम केलेलं आहे.

Recommended

Loading...
Share