By  
on  

सुबोध भावेचा हा सिनेमा आता पाहता येणार ओटीटीवर

कोरोनाग्रस्त काळात लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वाचं काम मोठ्या प्रमाणात ओटीटीवर सुरु झालं. सिनेरसिक आता ओटीटीकडे मोठ्या प्रमाणात वळले असल्याचं सध्याचं चित्र आहे. सिनेमागृहे बंद असल्यामुळे अनेक रखडलेले हिंदी सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले.  तर आता काही मराठी सिनेमे ओटीटीवर येत असल्याचं चित्र आहे. यात काही जुन्या सिनेमांचाही समावेश आहे.

"आणि डॉ काशिनाथ घाणेकर" हा सिनेमा आता ओटीटीवर पाहता येणार आहे. अभिनेता सुबोध भावेने याविषयीची माहिती सोशल मिडीयावर दिली. तो लिहीतो की, "ज्यांचा पाहायचा राहिला असेल आणि ज्यांना पुन्हा पहायचा आनंद घ्यायचा असेल त्यांच्यासाठी, "आणि डॉ काशिनाथ घाणेकर" आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध."

 

मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. अभिनेता सुबोध भावेने यात काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली आहे. 2018मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

तेव्हा आता हा सिनेमा सिनेमागृहात आणि टेलिव्हीजनवरही प्रेक्षकांचा पाहायचा राहून गेला असेल, किंवा पुन्हा पाहण्याची इच्छा असेल तर नेटफ्लिक्सवर हा सिनेमा आता पाहता येणार आहे.

अभिजीत देशपांडे दिग्दर्शित या सिनेमात सुबोध भावेसह या सिनेमात सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, वैदेही परशुरामी, प्रसाद ओक, नंदिता धुरी, सुहास पळशीकर, आनंद इंगळे, अमृता खानविलकर हे कलाकार झळकले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive