By  
on  

लग्नानंतर अशी बदलली ही मराठी अभिनेत्री, मनोरंजन इंडस्ट्रीतून झाली आहे गायब

एकेकाळी मराठी टेलिव्हिजन गाजवणारी अभिनेत्री नेहा गद्रे बऱ्याच कालावधीपासून या मनोरंजन विश्वापासून दूर आहे. मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेहा सक्रिय असते. आणि आता तिने नुकतेच पोस्ट केलेले काही फोटो चर्चेत आले आहेत. याचं कारण आहे नेहाचा मेकओव्हर.

नेहाने नुकतेच तिच्या मेकओव्हरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात नेहाला ओळखणही कठीण जात आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Life is too short to have boring hair!! #shorthairdontcare #hairgoals #newlook

A post shared by NEHA (@nehagadre12) on

 

नेहा गद्रे ही पति ईशान बापटसोबत ऑस्ट्रेलियात राहते. लग्नानंतर नेहा ही ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. ऑस्ट्रेलियात गेल्यापासून नेहाचा लुकही प्रचंड बदलेला पाहायला मिळतोय.

टेलिव्हिजनवरील अनेक कार्यक्रमांमध्ये नेहा दिसली आहे. त्यापैकी 'मन उधाण वाऱ्याचे' आणि 'अजूनही चांद रात' आहे या मालिकामध्येही ती झळकली. याशिवाय नेहाने काही मराठी सिनेमे देखील केले आहेत. 'मोकळा श्वास' आणि 'गडबड झाली' या मराठी सिनेमांमध्ये नेहाने भूमिका साकारल्या आहेत. मात्र लग्नानंतर नेहा मनोरंजन विश्वापासून दुरावली आहे. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive