By  
on  

या खास व्यक्तिकडून मितालीला मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री मिताली मयेकरचा आज वाढदिवस असल्याने सोशल मिडीयावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी मितालीला सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र एका खास व्यक्तिने मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही खास व्यक्ति दुसरी तिसरी कुणी नसून ती व्यक्ती आहे सिद्धार्थ चांदेकर.  

मिताली मयेकरचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकरनेही सोशल मिडीयावर खास पोस्ट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने मितालीसोबतचा एक फोटो पोस्ट करून लिहीलय की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा पमकीन. तुझ्याबरोबर पुन्हा इथे पळण्याची वाट पाहत आहे."

सिद्धार्थ-मिताली दोघांनाही भटकंतीची आवड आहे. दोघं विविध देशांमध्ये भटकंती करत असतात. तेव्हा कोरोनाग्रस्त परिस्थितीत सगळं पुर्ववत झाल्यावर लवकरच दोघं पुन्हा भटकंती करत फिरतील यात शंका नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday Pumpkin. Waiting to run away here again with you. Lets.. . . . . #tinypanda

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

 

सिद्धार्थ आणि मिताली यांची मैत्री सोशल मिडीयाच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम जुळलं. मागली वर्षी दोघांनी साखरपुडादेखील केला आहे. लवकरच दोघं लग्नबंधनात अडकतील. कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे दोघं पुढील वर्षी लग्न करणार असल्याचं वृत्त आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive