पाहा Video : या अभिनेत्याला लावणी सादर करताना पाहुन तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

By  
on  

अभिनेता पुष्कर जोगने लॉकडाउनच्या काळात त्याचं युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. पुष्करला डान्सची प्रचंड आवड आहे. त्यामुळे या चॅनेलवर तो त्याचे विविध डान्स व्हिडीओ पोस्ट करताना दिसतोय. मात्र पुष्करने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओची प्रचंड चर्चा होत आहे. 

पुष्करने नुकतच त्याच्या डान्स व्हिडीओचा एक टिझर पोस्ट केला होता. हा टिझर पाहून सगळ्यांचीच उत्सुकता वाढली होती. या टिझरमध्ये लावणी डान्स पाहायला मिळाला. मात्र हा डान्स नेमकं कोण करतय हे गुलदस्त्यातच होतं. मात्र आता टिझरनंतर हा पूर्ण डान्स व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

या डान्स व्हिडीओत दुसरं तिसरं कुणी नसून स्वत: पुष्कर जोग आहे. पुष्करने चक्क स्त्री वेशात लावणी सादर केलेली आहे. लावणीच्या वेशभुषेत येऊन पुष्करने बहारदार लावणी सादर केली आहे. पुष्करच्या या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांचा प्रचंड चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पुष्करचा हा हटके प्रयोग अनेकांना आवडलेला दिसतोय. 'तुमच्या गिरणीचा वाजू दे भोंगा' या गाण्यावर पुष्करने ही सुंदर लावणी सादर केली आहे.

पुष्करला या रुपात पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र त्याच्या डान्सचंही कौतुक होत आहे.

Recommended

Loading...
Share