By  
on  

पाहा Video : सुव्रत जोशीला आहे या गोष्टीचं आकर्षण, लंडनमध्ये झाडावरून पाडून खाल्ली फळं

अभिनेता सुव्रत जोशीने सोशल मिडीयावर नुकतीच एक मजेशीर पोस्ट केली आहे. सध्या लंडनमध्ये असलेल्या सुव्रतला तेथील लोकांनी शहरामध्ये टिकवून ठेवलेल्या निसर्गाची गोडी वाटते आहे. याच संदर्भातली खास पोस्ट त्याने केली आहे. सुव्रतला झाडावरून फळ पाडून खाण्याचं खास आकर्षण आहे.

लंडनमधील रस्त्यावरील एका कोपऱ्यावर पेर फळाची झाडे त्याला दिसली. आणि या झाडांवरून फळे पाडून खाण्याचा मोह सुव्रतला आवरता आला नाही. त्याने लगेचच त्या झाडाजवळ जाऊन झाड हलवुन काही पेर काढले. यावेळी सोबत नसलेल्या पत्नि सखीचीही सुव्रतला आठवण झाली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एखाद्या झाडावरुन फळ पडून खाण्याचे मला भयंकर आकर्षण आहे. मला निसर्गाचेच आकर्षण आहे म्हणा ना! भारतात वाढणाऱ्या शहरातत तुकड्यातुकड्याने वाटला गेलेला आणि कशीबशी स्वतःची जागा टिकवून ठेवणारा बापुडा निसर्ग माझे लक्ष अगदी सहज वेधून घेतो. या वर्षी इंग्लंड मध्ये फारच मोठा काळ राहायचा योग आला. इथे मात्र लंडन सारख्या अद्ययावत शहरामध्येही येथील लोकांनी निसर्ग टिकवून ठेवला आहे. तो असा इमारतींच्या चिमटीत सापडलेला, कसाबसा श्वास घेत तग धरून नसतो. तो शहराचा आत्मा असल्याप्रमाणे ताठ मानेने स्वतःच्या ऋतुचक्रात रमलेला असतो. शहरात अगदी मध्यवर्ती भागातही लोकांनी दारात फार काळजीने आणि प्रेमाने वाढवलेली फुलझाडे आणि फळझाडे आहेत. वसंतात आणि अगदी आषाढात देखील त्यांच्या त्यांच्या निसर्गक्रमाने ती फुलांनी तसेच फळांनी डवरतात. मध्यंतरी चालताना आमच्या घरापासून जवळच सखी आणि मी एका दारात चेरीनी लगडलेले एक झाड पाहिले. आमच्या तोंडाला पाणी सुटले आणि झाडावरुन झाडावरुन फळं पाडून खाण्याच्या आदिम इच्छेने आम्हाला पछाडले. घराचे लोखंडी दार बंद होते. त्यावरून उडी टाकून,चोरून आता शिरावे आणि त्या चेऱ्यांचा फज्जा उडवावा असा विचारही आला पण मग वयाने आणि शहरी सभ्यतेने जड केलेल्या मनानेच ती इच्छा दाबून टाकली. (तसे काही वेळा अनावर होऊन आम्ही रस्त्यावरील दुर्लक्षित कोपऱ्यावर फुललेल्या काही फुलांना स्थलांतरित करून आमच्या शयनकक्षेत मानाचे स्थान दिले आहेच म्हणा) पण मग अनेक ठिकाणी सफरचंद आणि पेर यांनी लगडलेली अनेक झाडे आम्हाला दिसू लागली. गेल्या आठवड्यात इथे इंग्लंड मधील गावाकडे थेम्सच्या किनारी नदीच्या मध्यात असलेल्या एक छोट्या बेटावर 'पेर' नी लगडलेले एक झाड आम्ही पाहिले. नाव आली की तिला वाट करून द्यायला दुभंगणारा एक पूल त्या बेटापर्यंतजात होता. आम्ही बिनधास्त त्यावरून त्या झाडाकडे गेलो पण बरीचशी फळे तेव्हा कच्ची होती. काल संध्याकाळी मी तिथे गेलो तेव्हा तो पूल दुभंगलेला होता आणि त्या कालव्यातून एक चष्मा घातलेली एक मध्यमवयीन स्त्री तिचे छोटे जहाज पार करून नेत होती. तिचा दहा बारा वर्षाचा मुलगा अतिशय हुशारीने ते दार उघडणाऱ्या यंत्र चालवत होता. मी तिथे गेल्यावर "तुम्हाला पलिकडे बेटावर जायचे आहे का?" असे चटपटीत पणे त्याने विचारले. मी "हो" असे म्हटल्यावर "तुमची नाव तिथे आहे का?" असा प्रतिप्रश्न त्याने केला. "नाही,मला त्या पेर च्या झाडाकडे जायचे आहे" मी त्याचे शंकानिरसन केले. #पुढील लेख कमेंट्स मध्ये#

A post shared by Sula (@suvratjoshi) on

 

याविषयी सुव्रतने एक भलीमोठी पोस्ट लिहीली आहे. या सगळ्या प्रसंगाचं वर्णन त्याने उत्तम केलं आहे. शिवाय ते फळ खातानाचा व्हिडीओही त्याने पोस्ट केला. याशिवाय सुव्रतला कवी बा. सी. मर्ढेकर यांची कविताही या क्षणाला आठवली. लंडनच्या त्या कोपऱ्यात सुव्रतला सापडलेला हा आनंद त्याने या पोस्टमधून शेयर केला आहे. अनेकांना सुव्रतची ही पोस्ट आवडली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive