By  
on  

प्राजक्ता गायकवाड म्हणते "जगायचं असं की कोणी नाद केला नाही पाहिजे"

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता 'आई माझी काळुबाई' या आगामी मालिकेत झळकणार आहे. या मालिकेतून प्राजक्ता पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

प्राजक्ता ही सोशल मिडीयावरही सक्रिय असते. सोशल मिडीयावर ती तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. शिवाय तिथे तिचा मोठा चाहतावर्गही तयार झालाय. प्राजक्ताने नुकतेच तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. प्राजक्ताने एका कार्यक्रमातील हे फोटो पोस्ट केले आहेत. 

 

प्राजक्ताच्या या पोस्टचं कॅप्शन मात्र हटके पाहायला मिळतय. तिने लिहीलय की, "वागायचं असं की कोणाला ञास झाला नाही पाहिजे आणि जगायचं असं की कोणी नाद केला नाही पाहिजे."

प्राजक्ताचं हे भन्नाट कॅप्शन तिच्या चाहत्यांनाही चांगलच आवडलेलं दिसतय. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive