पाहा Photos : सिद्धार्थ जाधवने दिला असा धमाकेदार परफॉर्मन्स

By  
on  

नुकताच झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याचं चित्रीकरण करण्यात आलं. या सोहळ्यात अनेक कलाकार उपस्थित होते. अनेक कलाकारांचा पुरस्कार करुन गौरव करण्यात आला तर काही कलाकारांनी सोहळ्यात बहारदार परफॉर्मन्स सादर केला.

अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही या मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला आहे. सिद्धार्थने नुकतेच या परफॉर्मन्सचे काही क्षणचित्रे सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या परफॉर्मन्ससाठी सिद्धार्थ जाधवने खास लुकही केला होता. डोक्याला फेटा बांधून सिद्धार्थने मराठमोळा लुक करून यावेळी मंचावर नृत्य सादर केलं.

सिद्धार्थ जाधवने याआधीही अनेक पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स सादर केले आहेत. नेहमीप्रमाणे हा परफॉर्मन्सही सगळ्यांचं लक्ष वेधेल यात शंका नाही.

 

लवकरच हा पुरस्कार सोहळा टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.

 

Recommended

Loading...
Share