By  
on  

आनंदीबाईंच्या कार्याला सांगीतिक सलाम, ‘तू आहेस ना’ गाण्याचं मेकिंग पाहिलं का?

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा बायोपिक ‘आनंदीगोपाळ’ हा सिनेमा रिलीज व्हायला काहीच वेळ शिल्लक राहिला आहे. त्यापुर्वी या सिनेमातील ‘तू आहेस ना’ या गाण्याचं मेकिंग समोर आलं आहे. या गाण्याचे बोल वैभव जोशीचे आहेत. जसराज जोशी, अवधुत गुप्ते, राहुल देशपांडे, आदर्श शिंदे आणि रोहीत राऊत या आघाडीच्या गायकांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. संगीत त्रिदेव यांचं आहे. अंत्यत रेशमी स्वरांनी या गाण्याची सुरुवात होते. आनंदीबाई आणि गोपाळरावांच्या नात्यातील अव्यक्त बंधाची जाणीव हे गाणं ऐकताना होते, खरं तर आनंदी गोपाळ सिनेमातील सगळीच गाणी श्रवणीय आहेत पण ‘तू आहेस ना’ ची बातच न्यारी आहे.

https://twitter.com/TheZeeStudios/status/1095613798952534017

आनंदीबाईंनी पतीचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय मानलं आणि समोर अडचणींचा डोंगर उभा असतानाही जिद्दीने वैद्यकिय शिक्षण घेतलं. समुद्रपर्यटनाला महापाप मानणा-या, चुल आणि मुल हेच स्त्रिचं परम कर्तव्य असलेल्या समाजात एकट्या स्रीने परदेशी जाऊन डॉक्टर होणं ही खुप अभिमानाची गोष्ट आहे. आनंदीबाईंचा हाच खडतर प्रवास आनंदी गोपाळ या सिनेमातून १५ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे.

https://www.instagram.com/p/BtkeLf5hBDk/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

PeepingMoon Exclusive