By  
on  

अग्गंबाई ! सासूबाईंनी बनवला हा थाई पदार्थ, त्यांच्या ख-या बबड्याकडून शिकल्या ही रेसिपी

अग्गंबाई..सासूबाई फेम प्रसिध्द अभिनेत्री निवेदिता सराफ या जशा मालिकेत सुगरण आहेत तशाच ख-या आयुष्यातसुध्दा. त्याचं स्वत:चं युट्यूब चॅनेल असून त्या माध्यमातून त्या चाहत्यांसोबत अनेक हटके आणि चविष्ट रेसिपीज शेअर करतात. 

आज निवेदिता यांनी चक्क एक थाई रेसिपी आपल्या प्रेक्षकांना शिकवलीय. तेसुध्दा थाई पध्दतीचे न्यूडल्स आणि ते त्यांना चक्क त्यांच्या ख-या आयुष्यातल्या बबड्याकडून शिकायला मिळालेत. म्हणजेच त्यांचा मुलगा अनिकेत सराफ याने आईल म्हणजेच निवेदिता यांना थाई न्यूडल्स करायला शिकवलेत. हा थाई न्यूडल्सचा व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडाला पाणी नाही सुटलं तरच नवल. 

ही खुपच इंटरेस्टींग रेसिपी असल्याने चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 
 

 

आपल्या नवनवीन रेसिपी चाहत्यांपर्यंत पोहोचावी यासाठी निवेदिता या सतत प्रयत्नशील असतात.'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत त्या आसावरीच्या भूमिकेत आहेत. ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. शिवाय त्यांची भूमिकाही प्रेक्षकांना आवडतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive