By  
on  

वरुण धवनने शेअर केलं या मराठी सिनेमाचं पोस्टर

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय वरुण धवन आणि मराठी सिनेमात? बसला ना आश्चर्याचा धक्का. कोणत्या सिनेमा आहे हा असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर असं अजिबातचं नाहीए. मराठी सिनेमात झळकण्याचे कुठलेच प्लान्स सद्या तरी नाहीत. पण वरुण धवनने नुकंतच एका मराठी सिनेमाचं पोस्टर आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केले आहे.

'लोकल व्हाया दादर' या मराठी सिनेमाचं पोस्टर चाहत्यांसोबत शेअर करत वरुण धवनने या सिनेमाचे दिग्दर्शक नितीन रोकडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच सिनेमाची कथा आणि् पटकथेची जबाबदारीसुध्दा तेच सांभाळत आहेत.

https://twitter.com/Varun_dvn/status/1095750104391303168

'लोकल व्हाया दादर' या सिनेमाच्या पोस्टरवरुन तरी हा सिनेमाची कथा प्रेमकहाणी असल्याचा अंदाज येतोय. पण अद्यापतरी ह्या सिनेमातल्या कलाकारांचा उलगडा झालेला नाही. पण वरुणने या सिनेमाचं पोस्टर उलगडल्याने सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive