प्रेमाची युथफुल परिभाषा उलगडणार ‘अशी ही आशिकी’ सिनेमातून, ट्रेलर रिलीज

By  
on  

प्रेमाची परिभाषा प्रत्येक जनरेशननुसार बदलत जाते. एकेकाळी केवळ नजरेने व्यक्त होणारं प्रेम आता सोशल मिडियाने वेढलेलं आहे. प्रेमाची अशी बदलती परिभाषा दिसतीये ‘अशी ही आशिकी’ च्या ट्रेलरमध्ये. गुलशन कुमार प्रस्तुत आणि टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर रिलीज करण्यात आला. टी-सिरीज निर्मित करत असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या चित्रपटाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे सुध्दा या चित्रपटाचे निर्माते आहेत. अशी ही आशिकी’ या चित्रपटात अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे आणि हेमल इंगळे ही एकदम फ्रेश जोडी दिसणार आहे.

या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये स्वयम आणि अमरजा यांच्यातील लव्हस्टोरी दिसत आहे. पण ही स्टोरी वाटते तितकी सरळ नाही. प्रेमाच्या वाटेत येणारे अनेक चढ उतार पार करून अमरजा आणि स्वयमची लव्हस्टोरी यशस्वी होते का याची उत्सुकता ट्रेलर पाहताना निर्माण होते. सिनेमातील लोकेशन्स प्रेक्षकांना मोहात पाड्णारे आहे. हा सिनेमा १ मार्च २०१९ला प्रदर्शित होणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=Im4ueHHlq6c

 

 

Recommended

Loading...
Share