By  
on  

मराठी बिग बॉस फेम पु्ष्कर जोगने असा साजरा केला पत्निचा वाढदिवस

अभिनेता पुष्कर जोगच्या आयुष्यात त्याची पत्नि जास्मिन आणि मुलगी फेलिशा या खास व्यक्ति आहेत. सोशल मिडीयावरही पुष्कर यांच्याविषयी पोस्ट करताना दिसतो. मात्र पत्नि जास्मिनने नुकतच एका खास गोष्टसाठी पुष्करचे आभार मानले आहेत.

जास्मिनच्या वाढदिवसानिमित्ताने पुष्करने साध्या सोप्या पद्धतिने वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं आहे. या सेलिब्रेशनचा फोटो पोस्ट करून जास्मिनने पुष्करचे आभार मानले आहेत. नुकतच तिने सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयी लिहीलं आहे. 

जास्मिन या पोस्टमध्ये लिहीते की, "धन्यवाद बेबी आणि हबी या घरात केलेल्या छान, शांत आणि साध्या बर्थडेसाठी."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank U Baby & Hubby for an Awesome , Quiet & Simple Birthday @ Home ! ️ #lockdownbirthday #family . @jogpushkar

A post shared by Jasmine Brahmbhatt (@jasmine_brahmbhatt) on

 

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक गोष्टी घरातच साजऱ्या केल्या जात आहेत. तेव्हा पुष्करनेही पत्निचा वाढदिवस असाच घरात साजरा केला आहे. यावेळी या फोटोत पुष्कर आणि जास्मिनसह गोंडस मुलगी फेलिशा देखील दिसतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive