By  
on  

दिग्दर्शक नागराज मंजुळेंना अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठाकडून चर्चासत्रासाठी आमंत्रण

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सिनेमांचं नेहमीच कौतुक होतं. विविध चाकोरीबाह्य  विषयांवर सखोल आणि अभ्यासपूर्वक सिनेमे देणे ह्यात नागराज मंजुळे यांचा हातखंडा.अनेक व्यासपीठांवरुन आजपर्यंत त्यांचा आणि त्यांच्या मराठी सिनेसृष्टीतील कार्याचा गौरव झाला आहे. पण आत्ता अभिमानास्पद बाब म्हणजे नागराज मंजुळे यांना चक्क हॉर्वर्ड विद्यापीठाकडून चर्चासत्राचं आमंत्रण मिळालं आहे.

हॉर्वर्ड विद्यापीठामध्ये आयोजित इंडियन कॉन्फरन्स 2019 मध्ये भारतीय सिनेसृष्टीतील काही दिग्गज मंडळी आपले विचार मांडणार आहेत. 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी ही कॉन्फरन्स आहे. ह्यात नागराज मंजुळे यांचंसुध्दा एक सत्र आहे.या चर्चासत्रात नागराजसोबत साऊथ इंडस्ट्रीतील दिग्दर्शक पा रंजिथ, माजी मिस इंडिया निहारिका सिंग, निर्माता बोमक्कू मुरली यांचासुध्दा समावेश असून   सुरग येगडे हे या चर्चासत्राचे सूत्रसंचालन करतील.

 

https://www.facebook.com/photo.php?fbid=10205713166504143&set=a.2621171224266&type=3&theater

जागतिक पातळीवरील इतक्या मोठ्या व्यासपीठावर आपले विचार मांडण्याची संधी मिळणं ही प्रचंड अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे आणि ती फक्त नागराज मंजुळे यांच्यासाठीच नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी. लवकरच बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive