अभिनेत्री पर्ण पेठे आणि आलोक राजवाडेने केली कोरोनावर मात

By  
on  

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अजूनही वाढताना दिसत आहेत. यातच मनोरंजन विश्वातील कलाकारही कोरोनाच्या विळख्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतय.

अभिनेत्री पर्ण पेठे आणि आलोक राजवाजे या दोघांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचं पर्णने नुकतच तिच्या सोशल मिडीया पोस्टमधून सांगीतलय. पर्णने ते नुकतेच कोरोनामधून बरे झाले असल्याची पोस्ट केली आहे. तिने या पोस्टमध्ये आलोकला टॅग केलं असल्यानं दोघांनीही कोरोनाचा संसर्ग झालं असल्याचं कळतय. मात्र त्यांनी आता कोरोनावर मात केली असल्याचं पर्ण या पोस्टमध्ये सांगते.

 

या पोस्टमध्ये पर्ण लिहीते की, "कोव्हिड 19 ला हाय आणि बाय बोलून झालय. आणि आता लवकरच प्लाझ्मासाठी तयार असू. ज्यांना मदतीची गरज आहे आणि जे कोव्हिडशी लढा देत आहेत त्यांना मदत करण्यासाठी तयार असू. तुमझ्या शरीरावर विश्वास ठेवा, मास्क घाला आणि ही गोष्ट हलक्यात घेऊन नका. सगळ्या डॉक्टर्स, मित्रमंडळी, परिवार यांचे प्रेम आणि काळजीसाठी धन्यवाद. आपण या सगळ्यात एकत्र आहोत."

तेव्हा कोव्हिडच्या आजारातून बरे होऊन लवकरच प्लाझ्मासाठीही तयार असल्याचं पर्ण या पोस्टमध्ये म्हणतेय. 

Recommended

Loading...
Share