By  
on  

आशालता ताईंना सुबोध भावेने वाहिली श्रद्धांजली, म्हटला "आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या"

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनाने मराठी कलाविश्व हळहळ व्यक्त करत आहेत. 'आई माझी काळुबाई' मालिकेच्या चित्रीकरण दरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाली आणि कोरोनाशी झुंज देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनेक कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी त्यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेता सुबोध भावेने देखील पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सुबोध भावे या पोस्टमध्ये लिहीतो की, "प्रदीर्घ काळ स्वतःच्या अभिनयाने संगीत रंगभूमी,चित्रपट आणि मालिका या सर्वच ठिकाणी लीलया काम करणारी आमच्या सर्वांची "माँ" , आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या. आशाताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली (या वर्षी फेब्रुवारी मध्ये तिला शेवटचं प्रत्यक्ष भेटलो तेव्हाचा हा फोटो)"

आशालता यांच्यासोबतच्या शेवटच्या भेटीचा फोटो पोस्ट करून सुबोधने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive