By  
on  

या गायकांनी गायलं 'डान्सिंग क्वीन'चं वजनदार शीर्षक गीत, पाहा मेकिंग व्हिडीओ

डान्सिंग क्वीन हा नवा डान्स कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यात प्लस साईज स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. आर जे मलिष्का आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या कार्यक्रमाचे परिक्षक आहेत.

या कार्यक्रमाचं शीर्षक गीतही कार्यक्रमाप्रमाणे धमाकेदार आणि वजनदार झालय. नुकतच झालेल्या या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा मेकिंग व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

 

हे धमाकेदार शिर्षक गीत गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांनी गायलं आहे. या दोघांच्या सुरेल आवाजात हे गाणं चांगलचं खुललय. गीतकार मंदार चोळकर यांनी हे गाणं लिहीलं असून संगीतकार अविनाश विश्वजीत यांचं संगीत या गाण्याला लाभलय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive