By  
on  

सोशल मिडीयावर या अभिनेत्रीचे व्हिडीओ असतात चर्चेत

सध्या सोशल मिडीयावर बहुतांश मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. टीकटॉक ऐप बंद झाल्यानंतर इन्स्टाग्रामचे रील फिचर मोठ्या प्रमाणात वापरलं जातय. खासकरून मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांचे विविध व्हिडीओ पोस्ट करताना दिसतातय.

अभिनेत्री हेमांगी कवीचेही अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. हेमांगीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक अदाकारी व्हिडीओ दिसतात. हेमांगीच्या चाहत्यांनाही तिचे हे व्हिडीओ प्रचंड आवडतात. हेमांगी ही टीकटॉकवर मोठ्या प्रमाणात सक्रीय होती. त्यावर तिचे व्हिडीओ अक्षरक्षह व्हायरल होत असे. आणि आता इन्स्टाग्रामवरही हेमांगी विविध व्हिडीओ पोस्ट करताना दिसते.

 

हेमांगीच्या काही व्हिडीओंना चाहत्यांचे हजारो लाईक्स मिळतात. यामध्ये काही सिनेमांचे डायलॉग, जुनी गाणी, तर कधी विनोद व्हिडीओ आणि बरेच मनोरंजनात्मक व्हिडीओ असतात. हेमांगी तिच्या या व्हिडीओंनी तिच्या चाहत्यांचं चांगलच मनोरंजन करते. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive