By  
on  

अभिनेता गौरव घाटणेकर झळकणार या मालिकेत, झाली शुटिंगला सुरुवात

अभिनेता गौरव घाटणेकर आता स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसणार आहे. एका वेबसिरीजचं शुटिंग संपवून गौरवने नुकतीच या मालिकेच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. गौरव स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेत दिसणार आहे. ‘तुज विण सख्या रे’ मधून रसिकांच्या समोर आलेल्या गौरवने अभिनयामुळे स्वत:चं असं स्थान निर्माण केलं आहे.

https://twitter.com/MarathiCineyug/status/1096786630336307202

ललित २०५ मधील आपल्या व्यक्तिरेखेसाठी गौरवने मेहनत घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा त्याच्यासाठी किती खास आहे ते समजतं. ललित २०५ या मालिकेने नुकताच १०० एपिसोडसचा टप्पा पुर्ण केला आहे. यावेळी सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलं.

Recommended

PeepingMoon Exclusive