‘आई कुठे काय करते’ ही मालिका थोड्या कालाधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ही मालिका आता प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांचे आवडते बनले आहेत. मात्र जशी या कलाकारांची ऑनस्क्रिन कमाल पाहायला मिळते तसेच या कलाकारांचं ऑफस्क्रिन छान नातं तयार झालं आहे.
या मालिकेतील गौरीच्या भूमिकेतील गौरी कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्तानेही या कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र एका खास व्यक्तिकडूनही गौरीला शुभेच्छा मिळाल्या आहेत. ही व्यक्ती म्हणजे या मालिकेत आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. गौरी मधुराणीला ताई म्हणून संबोधते. आणि याची ताईने सोशल मिडीयावर त्यांचा फोटो पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नुकताच या मालिकेत लग्नाचा सिक्वेन्स चित्रीत झाला. त्यावेळी हे कलाकार पारंपारिक वेशभुषेत दिसले. या मालिकेतील महिला मंडळ नऊवारी नेसून नटून थटून होते. त्याचदरम्यानचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
सध्या या मालिकेनं वेगळं वळण घेतलं आहे. संजना आणि अनिरुद्धच्या संबंधांविषयी अरुंधतीला आता सगळं कळलय. या धक्क्यातून ती कशी बाहेर येते हे पुढील भागांमधून समोर येईलच.