By  
on  

पाहा Video : यांच्यासोबत होते रिंकू राजगुरुच्या दिवसाची सुरुवात

सैराटच्या आर्चीने अर्थात रिंकू राजगुरुने आता तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सैराटनंतर अनेक सिनेमांमध्ये रिंकू झळकली. नुकत्याच केलेल्या हंड्रेड या हिंदी वेबसिरीजमधून तिने वेब विश्वात पदार्पण केलं आणि सगळ्यांचीच मनं जिंकली.

रिंकू सध्या घरात विविध गोष्टी करते. लॉकडाउनमध्ये तिने चित्रकला, व्यायाम अशा विविध गोष्टींना सुरुवात केली. रिंकूला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. तिच्या सोशल मिडीयावरही विविध प्राण्यांसोबत, पक्ष्यांसोबतचे तिचे व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या रिंकू तिच्या घरातील मांजरी, घरात येणार पक्षी यांच्यासोबतही वेळ घालवते. विशेषकरून रिंकूला मांजरी प्रिय आहेत. तिच्या घरातील मांजरींच्या पिल्लांसोबत तिचं घट्ट नातं निर्माण झालं आहे. याच गोंडस पिल्लांसोबत व्हिडीओ रिंकूने सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेयर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My day begins with them#morningvibes️ #

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

याच गोंडस पिल्लांसोबत रिंकूच्या दिवसाची सुरुवात होत असल्याचं रिंकू सांगते. या व्हिडीओत रिंकू या पिल्लांसोबत खेळताना दिसतेय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive