By  
on  

थिएटरमध्ये पडला टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस, शिवा सिनेमाला रसिकांची पसंती

अ‍ॅक्शन, रोमान्स, थिरकायला लावणारी गाणी असं एंटरटेनमेंटचं परीपूर्ण पॅकेज असलेला शिवा सिनेमा मनोरंजनाची उत्तम पर्वणी आहे. अभिनेता सिद्धांत मोरे, तन्वी हेगडे, योगिता चव्हाण, मिलिंद गुणाजी, योगेश मेहेर, सुनील गोडबोले, प्रकाश धोत्रे, शोभना दांडगे, जीत मोरे, बाबासाहेब सौदागर आणि कामराज ही कलाकार मंडळी सिनेमात आहेत. संगीत दिग्दर्शन आदित्य बेडेकर यांचं आहे तर बाबासाहेब सौदागर हे या सिनेमाचे गीतकार आहेत.

https://youtu.be/VJuj22GSSUk

१५ फेब्रुवारी २०१९ ला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला बीड, नांदेड, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रेक्षकांचा भरभरून उत्साहात प्रतिसाद मिळत आहे. सिनेमातील स्टंट पाहताना हिंदी सिनेमाची आठवण होतेच तर गाणी त्याच्या तालावर थिरकायला लावतात. त्याचबरोबर सिनेमाची कथा, पटकथा, छायांकन सगळ्या गोष्टी पाहून महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक आवर्जून हा सिनेमा पाहण्यासाठी जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सिनेमात साकारलेल्या शिवाला (सिद्धांत मोरे) पाहताना प्रेक्षकांमधून येत असेलल्या टाळ्या, शिट्ट्या आणि दमदार प्रतिक्रिया पाहून सिनेनिर्मितीचे अथक परिश्रम पूर्ण झाले अशी भावना निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.  या शुक्रवारी (१५ फेब्रु) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या शिवा सिनेमाला राज्यभरात उत्तम प्रतिसाद मिळतोय.

https://www.youtube.com/watch?v=xTdqzBBqQUA&t=73s

 

Recommended

PeepingMoon Exclusive