By  
on  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून 'आणि डॉ.काशिनाथ घाणेकर' च्या टीमचं कौतुक, कलाकारांनी मानले आभार

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. एवढच नाही तर आजही हा सिनेमा ओटीटी किंवा टेलिव्हिजनवर प्रेक्षक आवर्जुन पाहतात. मात्र नुकतच हा सिनेमा पाहिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी. हा सिनेमा पाहण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नव्हता. मात्र सध्या पावसाळ्यात घराबाहेर पडता येत नसल्याने त्यांनी नेटफ्लिक्सवर हा सिनेमा पाहिला आणि त्यांना हा सिनेमा प्रचंड आवडला. 

 

हा सिनेमा राज ठाकरे यांना इतका आवडला की त्यांनी सोशल मिडीयावर या सिनेमाच्या टीमचं कौतुक करणारी पोस्ट केली आहे. ते लिहीतात की, "आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमा जरी 2018 ला रिलीज झाला होता तरी माझा पाहायचा राहून गेला होता. पण बाहरे प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे बाहेर पडणं शक्यच नाही त्यामुळे नेटफ्लिक्सवर मराठी सिनेमा बघताना हा सिनेमा समोर आला आणि एका बैठकीत तो बघून संपवला. एका शब्दांत सांगायचं तर अप्रतिम सिनेमा. कमालीची उत्तम बांधलेली स्क्रिप्ट, स्क्रीनप्ले आणि अर्थात दिग्दर्शन पण. भालजी पेंढारकर सोडले तर डॉ. काशिनाथ घाणेकर, वसंत कानेटकर ते प्रभाकर पणशीकरांपर्यंत प्रत्येकाला भेटण्याचा मला योग आला होता आणि व्यंगचित्रकार असल्यामुळे प्रत्येकाच्या लकबी मी तेव्हा हेरल्या होत्या. आज सिनेमात प्रत्येक नटाचं काम पाहताना जाणवलं की ह्या सगळ्यांनी काय जबरदस्त ही सगली पात्र उभी केली आहेत. सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णई, आनंद इंगळे, प्रसाद ओक, मोहन जोशी, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी खरंच सगळ्यांचे अभिनय, कडक ! सिनेमात दाखवलेला काळ मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता, कोरोनोत्तर काळात पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे... आणि... नटांच्या, संहितेच्या जोरावर तसंच सिनेमात म्हटल्याप्रमाणे नाट्यवेड्या मराठी माणसाच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर 'हाऊसफुल्ल'चे फलक कायमचे लागू देत."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

राजसाहेब आपण चित्रपटांवर आणि त्यातही मराठी चित्रपटांवर मनापासून प्रेम करता आणि खंबीरपणे पाठीशी असता! आपण केलेल्या कौतुकाबद्दल आपले मनःपूर्वक आभार ! जय महाराष्ट्र! @viacom18marathi #sunilphadtare @ajit_andhare @saneness_ @unbollywood आणि डॉ.काशिनाथ घाणेकर चा संपूर्ण संघातर्फे आपल्याला धन्यवाद @raj_shrikant_thackeray

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

राज ठाकरे यांनी केलेल्या कौतुकाबद्दल 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाच्या टीमने त्यांचे आभार मानले आहेत. या सिनेमात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावेसह, प्रसाद ओक, सुमीत राघवन आणि इतर कलाकारांनी राज यांचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून आभार मानले आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive