By  
on  

सन्मान युवा धडाडीचा, पाहा युवा सन्मान आज संध्याकाळी सात वाजता झी युवावर

झी युवा ही अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली वहिनी बनली आहे. केवळ युवाच नाहीतर प्रत्येक वयोगटाला आकर्षित करणा-या झी युवावरील मालिकांनी रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच झी युवाने महाराष्ट्रातील युवांचा सन्मान करण्याचं ठरवलं आहे.

असं म्हणतात देशाचं भविष्य देशातील युवकांवर असतं. देशाचा खरा आधारस्तंभ युवा वर्गच असतो. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांचा, कार्याचा योग्य सन्मान होणं गरजेचं आहे. हेच ओळखून झी युवाने झी युवा सन्मान २०१८ चं आयोजन केलं आहे.

पुरस्काराच्या मालिकेत दहा क्षेत्रातील युवकांना सन्मानित करण्यात येणार आहे. कुस्तीपटू राहुल आवारे याला ‘झी युवा क्रीडा सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार आहे. तरुण वाचक घडवणारा युवा लेखक आनंद बनसोडे ‘साहित्य सन्मान’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संतोष गर्जे यांना सामाजिक जाणीव हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

देवानंद लोंढे याला ‘उद्योजक सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पाणी बनवणारी मशीन हा अद्भुत शोध लावणाऱ्या जव्वाद पटेल याची निवड ‘विज्ञान व तंत्रज्ञान सन्मान’ पुरस्कारसाठी झाली आहे. लोकगीताचा बाज जपत संगीत प्रयोगशील करणारी गायिका रेश्मा सोनावणे हिला ‘संगीत सन्मान’ चा किताब प्रदान करण्यात येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त युवा नेतृत्व हा सन्मान 'आदित्य ठाकरे', निलेश साबळे यांच्या कला क्ष्रेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी 'कला सन्मान', अभिनेत्री श्रेया पिळगावकर हिला 'युवा तेजस्विनी चेहरा' आणि मयुरी खैरे हिला बळीराजा सन्मान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचं प्रसारण आज २० जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता केलं जाणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive