'प्रीतम' हा मराठी सिनेमा येत्या 19 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता प्रणव रावराणे, नक्षत्रा मेढेकर, उपेंद्र लिमये हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने प्रणव आणि नक्षत्राची जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रिन झळकणार आहे.
या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान प्रणवने पिपींगमून मराठीशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्या आगामी सिनेमाविषयी माहिती दिली आहे. यावेळी प्रणवचा हटके लूक पाहायला मिळाला आहे. 'प्रीतम' या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान प्रणव हा लूक मिरवताना दिसत आहे. या लूकमध्ये वाढलेले केस आणि दाढी असा हा लूक आहे. हा लूक त्याने आगामी सिनेमासाठी केला असल्याचं तो यावेळी म्हटला. ‘आटपाडी नाईट्स’ या सिनेमात प्रणव अभिनेत्री सायली संजीवसोबत झळकला होता. आणि याच सिनेमातील काही टीम मिळून आगामी सिनेमा करत असल्याचं प्रणवने सांगितलं. याच सिनेमाचे दिग्दर्शक नितीन सुपेकर यांच्यासोबतच प्रणव त्याचा आगामी सिनेमा करत असल्याचं सांगितलं.
यावेळी प्रणव म्हटला की, “हा आगामी सिनेमासाठीचा लूक आहे. मी जास्त काही सांगू शकणार नाही. पण त्याच सिनेमासाठी हा लूक केला आहे.” या लूकमध्ये प्रणवला ओळखणही कठीण जातय. त्यामुळे या आगामी सिनेमात त्याची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
'दुनियादारी' या सिनेमात प्रणवने साकारलेली सॉरी ही भूमिका प्रचंड गाजली होती. याशिवाय अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाने प्रणवने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.