अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी आत्तापर्यंत विविध मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'जननी' हा त्यांचा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याच कार्यक्रमाच्या प्रमोशन दरम्यान पिपींगमूनने सुप्रिया यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या नव्या कार्यक्रमाविषयी सांगीतलं. यावेळी त्यांना नेपोटीझम आणि फेवरेटिझम विषयी विचारलं तेव्हा त्यांनी या मुद्द्यावर त्यांचं मत स्पष्ट केलं आहे.
सुप्रिया म्हटल्या की, “त्यांना काम मिळतं कारण ते कुणालातरी ओळखतात ते खरच भाग्यवान असतात. मला असं वाटतं की त्यांनी या गोष्टीचा फायदा घेत त्यातून काहीतरी चांगलं घडवून आणलं पाहिजे. ही त्यांची चूक नसते की ते अशा परिवारात वाढतात आणि जन्माला येतात. त्यांना या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. माझ्याही मुलीला बराच स्ट्रगल करावा लागला आहे आणि ती अजूनही स्ट्रगल करत आहे. तिला याविषयी काहीच हरकत नाही. याशिवाय मला असं वाटतं की मिळणारं काम कसही मिळतच आणि न मिळणार काम काही करून हातातून कसही निसटून जातं. हे सगळं नशीबावर अवलंबुन आहे.”
मनोरंजन विश्वातील नेपोटीझम या मुद्द्यावर सोशल मिडीयावर वादळ सुटलेलं पाहायला मिळालं होतं. सुप्रिया आणि सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया पिळगांवकरही या मनोरंजन विश्वात तिची वेगळी ओळख मिळवताना दिसतेय. यातच सुप्रिया पिळगांवकर यांनी या नेपोटीझम मुद्द्यावर केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं ठरतय.