PeepingMoon Exclusive: भाग्यश्रीसोबतच्या 'त्या' चर्चांवर भूषण प्रधानचा खुलासा, जाणून घ्या

By  
on  

मनोरंजनविश्वात एकत्र काम करताना त्या सहकलाकारांचं एकमेकांसोबत नाव जोडलं जाणं काही नवीन नाही. पण आजकाल सोशल मिडीयामुळे अशा जुळवा-जुळवीच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर चघळल्या जातात. एखाद्या कलाकाराने केलेल्या खास पोस्टमधून थेट तर्क-वितर्क लावले जातात. अशीच काहीशी नव्या जोडीची चर्चा मराठी मनोरंजनविश्वात गेल्या काही दिवसांत रंगली होती. 
 

मराठी सिनेसृष्टीचा हॅण्डसम हंक हिरो भूषण प्रधान याने टेलिव्हिजनवरची घाडगे एण्ड सून फेम लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली होती. भाग्यश्रीसोबतचा फोटो पोस्ट केल्याने सर्वांच्याच नजरा भूषणवर खिळल्या. सोशल मिडीयावर आणि अनेक माध्यमांमधून भूषण आणि भाग्यश्रीच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. पण या नात्याबाबत पहिल्यांदाच भूषण पिपींगमून मराठीसोबत व्यक्त झाला.
 

पिपींगमून मराठीसोबत या भाग्यश्रीसोबतच्या नात्याच्या चर्चांबद्दल बोलताना भूषण सांगतो,” आम्ही कलाकार एकमेकांसोबत काम करता करता एकमेकांचे खुप चांगले मित्र बनले आहोत. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात आम्ही एकमेकांचं खुप कौतुक करत असतो. पण सोशल मिडीयावर कलाकार आपल्या सहकलाकाराबद्दलच्या भावना सहसा व्यक्त करत नाहीत. पण आम्ही एकमेकांबद्दल लोक काय म्हणतील याचा विचार न करता सोशल मिडीयावर सहज व्यक्त झालो. आमच्यात फक्त खुप छान मैत्री आहे. म्हणूनच वाढदिवसाच्यानिमित्ताने एकमेकांबद्दल लिहावसं वाटलं ते लिहलं. बाकी काहीच नाही आणि असं काही असतं तर माध्यमांमधल्या तुम्हा मित्र-मैत्रिणींना नक्कीच कळवलं असतं.”

अभिनेता भूषण प्रधान तब्बल ८ वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या जय भवानी जय शिवाजी या ऐतिहासिक मालिकेत भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. लॉकडाऊननंतर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share