PeepingMoon Exclusive : अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा प्रतीक गांधीसोबत या सिनेमातून बॉलीवुड डेब्यू, म्हणते "प्रतीक हा प्रचंड मेहनती कलाकार"

By  
on  

मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि हिंदी मालिका विश्वात अभिनेत्री भाग्यश्री मोटेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेलुगू, तामीळ सिनेमातही ती झळकली आहे. यातच आता भाग्यश्रीची पावलं बॉलीवुडकडे वळली आहे. आगामी 'रावण लीला' या हिंदी चित्रपटातून भाग्यश्री बॉलीवुड डेब्यू करतेय. स्कॅम या सिरीजमधून प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता प्रतीक गांधीसोबत ती या सिनेमात झळकणार आहे.

पिपींगमून मराठीने नुकतच याविषयी भाग्यश्रीसोबत संवाद साधला आहे. भाग्यश्री सांगते की, "ट्रँगल निर्मिती असलेली ही पहिली हिंदी फिल्म आहे. मी हिंदी मालिकांमध्ये जेव्हा काम करायला सुरुवात केली होती, 'जोधा अकबर'नंतर मी 'महादेव' ही मालिका केली, 'सिया के राम' ही मालिका केली तीही ट्रँगलची निर्मिती होती. इनहाऊस ऑडीशन होते तेव्हा मला कळालं होतं. 2018 ला या चित्रपटाची प्रोसेस सुरु झाली होती. त्या कॅरेक्टरसाठी त्यांनी माझं व्यवस्थित ऑडीशनही घेतलं होतं."

या सिनेमाचा विषय आणि तिच्या भूमिकेविषयी भाग्यश्री सांगते की, "हा चित्रपट राम मंडलीवर आधारीत आहे. त्या मंडलीमधील कूक मी साकारतेय. प्यारी असं माझ्या पात्राचं नाव आहे. त्यात ज्या काही घडामोडी होतात, लोकं जे पाहतात आणि त्यामागे दडलेलं सत्य काय आहे हे यात पाहायला मिळणार आहे."

भाग्यश्री आणि प्रतीक गांधीसह या सिनेमात अंकूर भाटीया, अभिमन्यू शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हार्दिक गज्जर यांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. याआधी त्यांनी टेलिव्हिजनसाठी काम केलय.

गुजराती मनोरंजन विश्वात प्रतीक चांगलाच प्रसिद्ध आहे. पण स्कॅम या सिरीजमुळे प्रतीक गांधीला हिंदी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. प्रतीकसोबत काम करण्याचा अनुभवही भाग्यश्रीने यावेळी शेयर केला आहे. ती सांगते की, "प्रतीक गांधी हा प्रचंड मेहनती आणि डेडिकेटेड कलाकार आहे. आम्ही जेव्हा काम करत होतो, तेव्हा स्कॅम सिरीज आलीही नव्हीत. स्कॅमच्या आधीच आम्ही काम केलं होतं.   तेव्हाच माहिती होतं की या मुलात काहीतरी आहे. सेटवरही सीनमध्ये तो गुंग असायचा. एक कलाकार म्हणूत तो खूप कमाल आहे."

मराठी, हिंदीसह भाग्यश्रीने तेलुगू आणि तामिळ मनोरंजन विश्वातही काम केलय. हे करत असतानाही ती बॉलीवुडसाठीही प्रयत्न करत होती. 2013 मध्ये भाग्यश्रीचा एक हिंदी सिनेमा प्रदर्शित झालाच नाही. त्यामुळे तो डेब्यू हुकला. मात्र आता रावण लीलामधून डेब्यू करत असल्याचं भाग्यश्रीने सांगीतलं.

 तामिळ, तेलुगू सिनेमांच्या निमित्ताने साऊथ इंडस्ट्रीत काम करण्याच्या अनुभवाविषयी भाग्यश्री सांगते की, "ती लोकं खूपच डाऊन टू अर्थ आहेत. साधी आणि कामाशी खूप प्रामाणीक लोकं आहेत. तिकडच्या प्रेक्षकांचा प्रतिसाद वेगळाच असतो. मी एकदा चेन्नईत शूट करत होते, तेव्हा तिथे एक आजी आल्या आणि त्या माझ्या पायाच पडल्या होते. तिथे कलाकारांना देवाचं स्थान दिलं जात, कलाकारांची पूजा वैगेरे करतात. तर तिथला अनुभव हा वेगळाच असतो."

याशिवाय भाग्यश्रीचं प्राधान्य हे कायम कॉन्टेन्टला असणार असल्याचं ती सांगते.  चांगलं काम असेल तर मराठीतही काम सुरु राहणार असल्याचंही ती म्हटली. आगामी 'एकदम कडक' या मराठी सिनेमातून भाग्यश्री महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 


 

Recommended

Loading...
Share