Exclusive : 'देवमाणूस'साठी किरण गायकवाडच्या आईला मिळतात अशा प्रतिक्रिया, तर डिजे प्रोफेशनलाही किरण करतोय मिस 

By  
on  

'देवमाणूस' ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेत गंभीर विषय वेगळ्या पद्धतिने हाताळण्यात आलाय. एक विक्षिप्त, क्रूर डॉक्टर जो इतरांसाठी देवमाणूस आहे, त्याचा खरा चेहरा सगळ्यांपासून तो कसा लपवून ठेवतो हे 'देवमाणूस' मालिकेत पाहायला मिळतय. सध्या देवीसिंग हा कारागृहात आहे. त्याचा खरा चेहरा हा एसीपी दिव्यासमोर आल्याने तिने मात्र त्याला अटक केली आहे. मालिकेतील हे वळण सध्या लक्षवेधी ठरतय. या देवीसिंगची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाडसोबत पिपींगमून मराठीने नुकतीच एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे.  यानिमित्ताने किरणने त्याच्या खऱ्या आयुष्यातील विविध गोष्टींचा उलगडा केला आहे. या नकारात्मक भूमिकेसाठी इतरांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्याचा खऱ्या आयुष्यात होणार परिणामही तो सांगतो.

किरणची आई ही एक टिपीकल सिरीयल प्रेक्षक आहे. त्याची आईही ही मालिका फॉलो करते. मात्र किरणच्या आईला इतरांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया या वेगळ्या आहेत. किरणसोबत त्याच्या आईलाही नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरं जावं लागतं. किरण सांगतो की, "कुठल्याही आईला किंवा वडिंलाना आपल्या मुलाविषयीचं कौतुक ऐकायला आवडतं. पण माझ्या आईच्या बाबतीत नेमकं उलट होतं. माझी आई बाहेर जाते तेव्हा, काय मुलगा तुमचा कसलं काम करतोय वैगेर.. अशा प्रतिक्रिया येतात. आईच्या एका मैत्रिणीने तर मला शिव्या घातल्या आणि आईला खूप वाईट वाटलं. तर आई म्हटली की किरण हेअसं काम नको करूस. 
मी आईला म्हटलो की माझ्याबाबतीत कुणी काही बोललं, शिव्या दिल्या तर ते माझ्या कॅरेक्टरचं यश आहे. जेव्हा कुणी असं वाईट बोलल तर ते सकारात्मक पद्धतिने घे असं मी आईला सांगीतलं.पण आईसाठी एक चांगली भूमिका करायची आहे जेणेकरुन आईला कुणीतरी म्हणेल की चांगलं काम करतोय, म्हणजे नकारात्मक नाही तर चांगली भूमिका." 

अभिनय क्षेत्रात येण्याआधी किरण हा डिजे प्रोफेशनमध्ये होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याला संगीताची आवड आहे. याविषयी सांगताना तो म्हणतो की, संगीत हे त्याचं पहिलं प्रेम आहे आणि त्यानंतर अभिनय. अभिनय क्षेत्रात काम करत असताना किरणला आजही त्याच्या डिजे प्रोफेशनची आठवण येत असल्याचं तो सांगतो.

किरण म्हणतो की, " मी कधी आजारी जरी असेल आणि डिजेसाठी गेलो तर माझा ताप वैगेर पळून जायचe. आजही मला डिजेईंगची आठवण येते. जेव्हा केव्हा मला वेळ असतो तेव्हा मी म्युझिकसाठी वेळ देतो, गाणी ऐकतो. अर्थात मी डिजेईंगला खूप मिस करतोय."

Recommended

Loading...
Share