मराठी सिनेसृष्टीतला प्रसिध्द अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने घरगुती हिंसाचार आणि मारहाणीचा गुन्हा पुण्यात दाखल केला आहे. पती अनिकेतसोबतच स्नेहाने सासू-सास-यांविरोधातही तक्रार दाखल केली आहे. पत्नी अभिनेत्री स्नेहाने सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करु नये यासाठी अनिकेत सतत प्रयत्नशील असायचा, नातेवाईकांसमोर तिला सतत अपमानास्पद वागणूक द्यायचा. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असे स्नेहाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
सिनेसृष्टीतील या गोड-गोजि-या सेलिब्रिटी जोडीबद्दल ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अद्यापही अनेकजणांचा या बातमीवर विश्वासच बसत नाहीय. म्हणूनच पिपींगमून मराठीने एक्सक्ल्युझिव्हरीत्या अभिनेत्री स्नेहा चव्हाणसोबत संपर्क साधला असता स्नेहाने या संपूर्ण प्रकरणाबद्दल काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
अनिकेत आणि स्नेहाने डिसेंबर 2018 रोजी लग्नगाठ बांधली होती. या दोघांची ओळख 2018 साली प्रदर्शित झालेल्या हदयात वाजे समथिंग समथिंग या सिनेमामुळे झाली. या सेटवर हे दोघे पहिल्यांदा भेटले .
स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. तसेच त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.
तर, अनिकेतच्या मावशीने स्नेहाचं स्थळ त्याच्या आईला सुचवले होते.
त्यामुळेच लव्ह कम अरेंज मॅरेज म्हणता येईल.
स्नेहाने लाल इश्क या संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या पहिल्या मराठी सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण कैेलं.
त्यानंतर स्नेहाने मालिकेतही काम केलं. तसंच ती उत्तम नृत्यांगनासुध्दा आहे.