By  
on  

PeepingMoon Exclusive : विशाल निकमसोबतच्या वादावर सोनाली पाटीलचं स्पष्टीकरण, म्हटली “मला माझ्या मैत्रीचा आदर आहे”

बिग बॉस मराठी सिझन 3 चा खेळ दिवसेंदिवस रंगताना दिसतोय. यातच काही दिवसात फिनाले होणार आहे. ज्यात यंदाच्या सिझनचा विजेता किंवा विजेती घोषीत करण्यात येईल. दरवर्षीप्रमाणे बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्वही चर्चेत राहिलय. यात बी ग्रुपमधील सोनाली, विशाल, विकास आणि मीनल यांची मैत्री लक्षवेधी ठरली. या मित्रमैत्रीणींमध्ये वादही झाले. त्यात सोनाली पाटील आणि विशाल निकम यांच्यातील वाद चर्चेत आला होता. ज्यात विशालने सोनालीवर आरोप केले आणि त्यासाठी नंतर माफीही मागितली होती. 

नुकतीच सोनाली पाटील बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडली आहे. यावेळी पिपींगमून मराठीने सोनालीसोबत संवाद साधलाय. यावेळी सोनालीने बिग बॉस मराठीतील तिच्या प्रवासाविषयी सांगितलं. ती म्हणते की “लोकांचं मिळणार प्रेम पाहुन भरुन आलय. बी टीममधीलच कुणीतरी जिंकायला हवं. आम्ही चौघं टास्क दरम्यानही एकमेकांची काळजी घ्यायचो, एकमेकांचा आधार होतो. एकमेकांची चांगली साथ दिली. मिनलसोबत माझं छान बाँडिंग आहे.”


विशालसोबतच्या वादाविषयी यावेळी सोनालीने तिची बाजू मांडत स्पष्टीकरण दिलय. ती म्हणते की, “विशालकडून बऱ्याच अनपेक्षित गोष्टी बाहेर पडल्या. चावडीवर त्याला साधा प्रश्न विचारला गेला होता की सोनाली आणि मिनलसोबत असा का बोलतोस यावर प्रश्न होता. त्याने याआधी माझ्यासाठी छान पत्रही लिहीलं होतं. माझ्याकडूनही छान मैत्री होती. पण सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं ते उत्तर नव्हतं जे त्याने चावडीवर सांगितलं. मला अनपेक्षित होत्या या सगळ्या गोष्टी. त्याने त्या गोष्टीची माफीदेखील मागितली. आमच्या मैत्रीत वाद होत असायचे. चावडीवर जे बोलला त्याचा मला खूप त्रासही झाला.” 


सोनाली पुढे म्हणते की, “मी जशी आहे तशीच वावरते. मी पण खूप लेव्हलचे अर्थ लावू शकले असते. काही गोष्टी तो रागात बोलला कारण त्याचा राग प्रचंड आहे. त्याला त्याची चूक कळाली त्याचा मी आदर करते. मला माझ्या मैत्रीची कदर आहे. आमची मैत्री चांगली टिकवण्याचा माझ्याकडून प्रयत्न केला. मी कायम प्रयत्न केला की खटके नाही उडणार. मला त्याच्याशी भांडायला नाही आवडलं. बी टीमशी भांडायला मला नाहीच आवडायचं. मी टास्कमध्ये कोणती नाराजी ठेवली नाही. हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय.”


सध्या सुरु असलेल्या या खेळात फायनलिस्ट म्हणून सोनालीने दोन नावे सांगितली आहेत. ती सांगते की, “विशाल आण मिनल शाह हे दोघं मला फायनलिस्ट वाटत आहेत. मिनल ही एक व्यक्ती म्हणून चांगली आहे, काम किंवा टास्कच्या बाबतीतही ती चांगली आहे. विशालनेही चांगला गेम खेळला. तो सगळ्या गोष्टींमध्ये किंवा टास्कमध्येही चांगला आहे. त्यांचा गेम बघता हे दोघं मला फायनलिस्ट वाटत आहेत.”
सोनालीने आत्तापर्यंत वैजू नंबर 1 आणि देवमाणूस या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तर बिग बॉस मराठी सिझन 3 मध्येही एक स्पर्धक म्हणून तिच्या हटके अंदाजामुळे ती लक्षवेधी ठरली.

Recommended

PeepingMoon Exclusive