PeepingMoon Exclusive : लग्नाच्या दिवशीच रोहित आणि जुईलीचा रिसेप्शन सोहळा, 23 जानेवारी रोजी #Rohilee यांचे लग्न

By  
on  

लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांचा विवाहसोहळा येत्या 23 जानेवारी रोजी पार पडणार आहे. सध्या रोहित - जुईलीच्या लग्नाच्या विविध विधी पार पडत आहेत. पिपींगमून मराठीने या निमित्ताने रोहितशी खास बातचीत केलीय. रोहितने लग्नविधीविषयी माहिती देत लग्नाच्या दिवशीच रिसेप्शन सोहळाही पार पडणार असल्याचं यावेळी पिपींगमून मराठीला सांगितलय.

रोहितने लग्नाआधीच्या विधीविषयी या गोष्टी सांगितल्या आहेत. "नुकतीच डायका ही विधी करण्यात आलीय. परिवारातील पूर्वजांसाठी केली जाणारी ही विधी असते ज्यात वाद्यांच्या सहाय्याने हा विधी पार पडतो. नुकतीच  हळद देखील पार पडलीय. त्यानंतर देवक विधी पार पडला."

लग्नाविषयी सांगताना रोहित म्हटला की, "लग्न आणि रिसेप्शन एकाच दिवशी असेल. पारंपारिक मराठी पद्धतिने हे लग्न पार पडणार आहे. जुईली आणि माझा परिवार आणि काही मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या नियमांचे पालन करून हे लग्न पार पडेल."

येत्या 23 जानेवारी रोजी मुळशी येथे हे लग्न पार पडणार आहे. तेव्हा रोहित - जुईलीच्या या लग्नसोहळ्यात कोणकोणत्या सेलिब्रिटींची हजेरी पाहायला मिळेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. गेल्या काही वर्षांपासून रोहित आणि जुईली एकमेकांना डेट करत आहेत. तेव्हा अखेर हे गोड कपल आता लवकरच विवाहबंधनात अडकणार असून आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहेत. 

Recommended

Loading...
Share