By  
on  

PeepigmoonMarathi Exclusive : मला मराठीत काम करायचं नाही हा लोकांचा गैरसमज - श्रिया पिळगावकर

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची एकुलती एक लेक म्हणजे श्रिया पिळगावकर. स्वत:च्या हिंमतीवर आणि जिद्दीवर तिने आज हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. सिनेमा असो किंवा वेबसिरीज श्रिया सर्वत्र आपल्या अभिनयाची छाप पाडते. श्रियाच्या कारकिर्दीला खरी सुवर्ण झळाळी मिळाली ती बॉलिवूड किंग शाहरुख खानसोबत स्क्रीन शेयर करुन.त्यानंतर मिर्झापूर या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये स्विटी ही व्यक्तिरेखा साकारुन श्रियाने सर्वांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडलं. 

या वर्षी श्रिया पिळगावकर 'गिल्टी माइंड्स' आणि 'द ब्रोकन न्यूज' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता नव्या वर्षात ती ‘ताजा खबर’ घेऊन पुन्हा एकदा मनोरंजनासाठी सज्ज झालीय. आगामी ‘ताजा खबर’ या वेब सीरिजमध्ये श्रिया पिळगावकर एका देहविक्री करणाऱ्या मुलीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच तिच्या या भूमिकेची खुप चर्चा रंगलीय.  ‘ताजा खबर’ वेब सीरिजमधील श्रिया पिळगावकरच्या ‘मधू’ विषयी आणि तिच्या करिअरविषयी जाणून घेऊयात पिपींगमून मराठीच्या या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत.

 

   देहविक्रय करणा-या चुलबुल्या मुलीच्या भूमिकेला तु होकार कसा दिलास? 

-    मला 'ताजा खबर'ची गोष्ट खुपच जास्त आवडली, त्यामुळे या भूमिकेला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मधू ही व्यक्तिरेखा मी साकारलेल्या आत्तापर्यंतच्या भूमिकांमधली खुपच हटके भूमिका आहे. देहविक्रय करणा-या मधुला तिच्या आयुष्यातल्या भूतकाळाचं ओझं घेऊन जगायचं नाहीय, ती आयुष्यातला प्रत्येक क्षण एन्जॉय करतेय. तिला सतत फॅशनेबल रहायला आवडतं. आयुष्य अडचणींनी भरलेलं असलं तरी मधू ही सकारात्मक आहे. त्यामुळेच मला ती खुप आवडते. 

 

   या भूमिकेसाठी तु काही ऑनग्राऊंड एफर्टेस् घेतलेस का, म्हणजे त्यांच्या वस्त्यांमधून फिरणं, त्यांची देहबोली आत्मसात करणं?

- मी ऑनग्राऊंड मेहनत अशी काही केली नसली तरी मी त्यांच्या जीवनशैलीबद्दल खुप वाचन केलं या प्रोजेक्टसाठी. देहविक्रय करणा-या महिलांच्या अनेक मुलाखती वाचल्या. तसंच ऑनलाईन त्या पाहिल्या आणि त्यांची मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काहीजणींना मुद्दामून कोणीतरी या व्यवसायात ढकललं असतं, तर कोणी परिस्थितीमुळे तर कोणी स्वेच्छेने या व्यवसायाचा स्विकार करतात. त्यामुळे मी या व्यवसायाला इतर व्यवसायांसारखाच व्यवसायाचा दर्जा देईन. त्यांनासुध्दा एक स्वामिभान आहे. तो जपायलाच हवा. 

 

 

 

   भुवन बाम सोबतचं तुझं स्क्रीन शेयर करताना कशी धम्माल आली, तुमचं बॉंण्डंग कसं होतं ?

-    खरंच भुवन सोबत काम करताना खुप मजा आली.तो यात शौचालय मॅनेजरची भूमिका करतोय. त्याची व्यक्तिरेखा या सिरीजमधली मुख्य भूमिका आहे. तब्बल 12 गाणी यात आहेत. आमचं खुप छान ऑनस्क्रीन- ऑफस्क्रीन बॉंडिंग आहे.  त्याने माझ्या मिर्झापूरचं काम पाहून खुप कौतुक केलं होतं, तेव्हा आमचं एकत्र काम करण्याबद्दल बोलणं झालं . आता ४ वर्षानंतर आमचा एकत्र काम करण्याचा योग जुळून आला आहे. भुवनचा एकुणच प्रवास खुप प्रेरणादायी आहे. कंटेट क्रिएटर ते अभिनेता ते एका प्रोडक्शन हाऊसचा मालक . त्याने प्रत्येक वेळेस स्वत:ला सिध्द केलंय. 

 

  प्रथमेश परब, अतिशा नाईक या मराठी कलाकारांसोबत काम करताना आपलेपणा जाणवलाच असेल, काय सांगशिल?

-     प्रथमेश परब सोबत काम करताना खुप मजा आली. मला त्याचे बालक-पालक, टाईमपास हे सिनेमे खुप आवडतात. तर अभिनेत्री अतिशा नाईक यांची मी खुप मोठी फॅन आहे. पण आमचे जास्त सीन्स नव्हते. त्यांनासुध्दा माझं काम खुप आवडतं, असं त्या मला म्हणाल्या. एकूणत ताजा खबरसाठी उत्तम कलाकारांची भट्टी जमलीय आणि ते तुम्हाला वेबसिरीज रिलीज झाल्यावर नक्की जाणवेल. 

 

   कुठलही प्रोजेक्टस् स्विकारण्यापूर्वी आई-बाबांसोबत तु डिस्कस करतेस का ?

-    मला त्याचं मत जाणून घ्यायला खप आवडतं. पण ते माझ्या कुठल्याच निर्णयाला अपोझ करत नाहीत, त्यांना माहिती असतं की मला नेमकं काय करायचंय. कधी कधी मला त्यांना कुठल्याही प्रोजेक्टबद्दल आधी सांगण्यापेक्षा ते अनाऊंन्स झाल्यानंतरची एक्साईटमेंट किंवा त्यांच्यासाठी ते सरप्राईज असावं असं वाटतं. त्यामुळे त्यांना ते पाहायला जास्त मजा येईल. दोघांचं मार्गदर्शन तर मी नेहमीच घेते, ते लिजंड्स आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय माझा हा प्रवास अपूर्ण आहे. 

 

 

 

   तु वेबसिरीजमध्येच जास्त रमतेस असं तुला वाटत नाही का?

-    असं दिसत असलं तरी मला सर्वच प्लॅटफॉर्मवर काम करायला आवडतं. माझ्या मते, ओटीटी आता  जास्त प्रभावी माध्यम आहे. पण असं बिलकुल नाहीय की मी फक्त ओटीटीच करतेय, योगायोगाने सातत्याने तसे प्रोजेक्ट येतात. याऊलट माझे तीन सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. त्यात दोन ओटीटी रिलीज आहे तर एक थिएटरीकल रिलीज आहे. मला आत्तापर्यंत  ज्या स्क्रीप्ट्स आवडल्या त्या सगळ्या सिरीज फॉमॅट्सच्या होत्या. त्यामुळे असं काहीच नाहीय की मी फक्त ओटीटी ओरिएंटेड कामं घेते. 

 

 

 

   विविध दर्जेदार वेबसिरीजमधून आपल्या भूमिकांची छाप पाडणा-या श्रियाला मराठीत पाहण्यासाठी चाहते खुप उत्सुक आहेत, कधी पाहायला मिळेल आम्हाला तुला? 

मला माहित नाही, पण लोकांचा एक गैरसमज आहे की मला मराठीत काम करायचं नाही. ह्याच इंडस्ट्रीत काम करायचं त्या इंडस्ट्रीत करायचं नाही असा भेद मी कधीच ठेवला नाही.  मला एकुलती एक नंतर एकाच प्रकारच्या स्क्रीप्ट्स सतत येत होत्या. मला तसं नको होतं. पण मला काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. मी मराठीसाठी एका उत्तम स्क्रीप्ट्ची वाट बघतेय. जेव्हा मला मराठीसाठी हवी तशी स्क्रिप्ट मिळेल तेव्हा  मी लगेच ती स्विकारेन. तुम्हाला मी मराठीत दिसेन. माझ्यासाठी भाषा हा मुद्दा कधीच नाहीय. मी तेलुगू, इंग्शिल, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये कामं केलीयत.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive