By  
on  

Exclusive: मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते सलमानच्या ‘राधे’मध्ये झळकणर?

सलमानचा सिनेमा येणार म्हटलं की संपुर्ण बॉलिवूडचं लक्ष त्याकडे लागलेलं असतं. सलमानच्या सिनेमांना लाभणारं यश आणि प्रसिद्धी हे तर यामागचं कारण आहेच. सलमानच्या सिनेमात झळकलेल्या कलाकारांची बॉलिवूडमध्येही चर्चा असते. सलमानच्या सिनेमात आजवर लक्ष्मीकांत बेर्डे, सोनाली कुलकर्णी, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, सविता प्रभुणे यांसारखे अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. आता आणखी एक प्रसिध्द कलाकार सलमानच्या आगामी सिनेमात झळकणार असल्याचं समजत आहे तो म्हणजे प्रवीण तरडे. प्रवीण सलमानच्या आगामी ‘राधे’ या सिनेमात विशेष भूमिकेत झळकणार असल्याचं सुत्रांकडून समजलं आहे.

'राधे' हा सलमानचा ‘वॉण्टेड’ या सिनेमाचा सिक्वेल असल्याचं बोललं जात आहे. हा सिनेमा प्रभूदेवा दिग्दर्शित करत आहेत. 2020च्या ईदला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते महेश मांजरेकर 'वॉण्टेड' या सिनेमात खास भूमिकेत होते. याशिवाय सलमानच्या ,‘जय हो’, ‘दबंग’, ‘रेडी’  या सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. महेश आणि सलमान यांची खास मैत्री जगजाहीर आहे. 'वॉण्टेड'प्रमाणे यातही महेश मांजरेकर खास भूमिकेत असण्याची वाट दोघांचेही फॅन्स पाहात असतील.तर 
महेश मांजरेकर आणि प्रवीण तरडे यांची देखील उत्तम मैत्री आहे. त्यामुळे सलमान, महेश मांजरेकर आणि प्रवीण तरडे हे त्रिकुट 'राधे'मध्ये दिसणार का याची उत्सुकता वाढली आहे.

 

प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’, ‘देऊळ बंद’, या सिनेमांचं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय ही 'त्रि'सूत्री जबाबदारी सांभाळली व या सिनेमांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं. तसंच 'कुंकू', 'पिंजरा', 'तुझं माझं जमेना'  यांसारख्या प्रसिध्द मालिकांचं लेखनही प्रवीण यांनीच केलं आहे. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता असा हरहुन्नरी कलाकार जर बॉलिवूडच्या वाटेवर असेल तर सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचेल. 'राधे'मधील भूमिकेबाबत खुद्द प्रवीण यांनी काही उल्लेख केला नसला तरी सलमानशी या संदर्भात चर्चा होण्याचे संकेत दिले आहेत.

 

 

खरं तर सलमान आणि प्रवीण यांची ही पहिलीच भेट नसणार आहे. यापुर्वीही ‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने त्यांची भेट झाली होती. सलमानचा भाऊ अरबाज खान प्रवीण यांचा ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमा पाहून इतका प्रभावित झाला की त्याने या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी सलमानने प्रवीण यांच्याकडून सिनेमाचे हक्कही विकत घेतले आहेत. त्यामुळे आता ‘आरारारा खतरनाक !’ हे शब्द सलमानच्या ‘राधे’मध्ये ऐकायला आले तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive