EXCLUSIVE : फेब्रुवारी 2020 मध्ये सई ताम्हणकर शूट करणार ‘मीमी’चं दुसरं शेड्युल

By  
on  

‘धुरळा’ सिनेमातील ‘बुरगुंडा’ प्रेक्षकांना चांगलीच भावली. ‘धुरळा’ सिनेमातील सई ताम्हणकरच्या भूमिकेचही चांगलचं कौतुक झालं.  आणि आता सई ताम्हणकर तिच्या आगामी सिनेमांच्या तयारीला लागली आहे. नुकतच सई ताम्हणकरला एका जाहिरातीच्या डबिंग स्टुडिओच्या बाहेर स्पॉट करण्यात आले. यावेळी पिपींगमून मराठीला सई ताम्हणकरने नुकतीच तिच्या आगामी सिनेमांविषयी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली.

सई ताम्हणकरचा आगामी मराठी सिनेमा ‘मिडीयम स्पायसीचं’ चित्रीकरण मागील वर्षी पूर्ण झालय. आणि हा सिनेमा येत्या जून महिन्यात येणार असल्याचं सईने यावेळी सांगीतलं. या सिनेमात सईसोबत अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री पर्ण पेठे दिसेल. मात्र मागील वर्षी घोषीत झालेल्या ‘पाँडिचेरी’ सिनेमाच्या रिलीजविषयी अद्यापही कोणतीच माहिती नसल्याचं सई म्हटली. मात्र ‘पाँडिचेरी’ सिनेमा याच वर्षी रिलीज होणार असल्याची शक्यता असल्याचं सई म्हटली. 
सई ताम्हणकरच्या आगामी हिंदी सिनेमाचीही सगळ्यांनाच उत्सुकता आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मीमी’ या सिनेमात सई झळकणार आहे. याच सिनेमाच्या पुढील चित्रीकरणाची माहिती सई ताम्हणकरने पिपींगमून मराठीला दिली आहे. फेब्रुवारी 2020मध्ये या सिनेमाचं दुसरं शेड्युल सुरु होणार असल्याच सईने सांगीतलं. शिवाय यासाठी सई लवकरच तयारी सुरु करणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Peek-A-Boooooo !!! #shootlife #saitamhankar #kritisanon #mimi @aasifahmedofficial

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

मराठी सिनेमा ‘मला आई व्हायचयं’ चा हा सिनेमा रिमेक आहे. या सिनेमात सई ताम्हणकर ही बॉलिवुड अभिनेत्री क्रिती सनॉनसोबत झळकणार आहे. 
 

 
  

Recommended

Loading...
Share